Nilesh Chavan Arrested : मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक, नेपाळमध्ये होता लपलेला

Nilesh Chavan Arrested from Nepal : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहावा आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश चव्हाणचा नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे. तो गेल्या आठवड्याभरापासून फरार होता.
Nilesh Chavan arrested from Nepal
Nilesh Chavan arrested from NepalSaam TV News
Published On

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहावा आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश चव्हाणचा नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे. तो गेल्या आठवड्याभरापासून फरार होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीच्या बाळाच्या ताब्यावरून नवा वादंग निर्माण झाला होता. दरम्यान, वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. हगवणे कुटुंबाने तयार केलेल्या कटात निलेश चव्हाण देखील सामील होता, असा गंभीर आरोप अनिल कस्पटे यांनी केला होता.

निलेश चव्हाणवर आरोप करत अनिल कस्पटे म्हणाले होते की, 'आत्महत्येनंतर सुनेच्या मुलाला तुम्ही निलेश चव्हाणकडे दिलंच कसं? निलेश चव्हाण तिथे उपस्थित कसा? मग या कटात मग तो पण सामील होता. मृत्यूपूर्वी बाळ आपल्या आईकडे होतं. मग जेव्हा लेकीचा मृत्यू झाला. तेव्हा हगवणे कुटुंब घरातच होतं, मग निलेश चव्हाण देखील तिथेच उपस्थित असू शकतो. निलेश चव्हाण देखील या कटात सामील आहे, हे मी ठामपणे सांगतो', असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता.

Nilesh Chavan arrested from Nepal
Pune Crime : हगवणे बंधूंचा शस्त्र परवान्यासाठी केविलवाणा प्रयत्न, लायन्सससाठी धडपड; हगवणे कुटुंबाचा पुण्यात नको तो कारनामा

अनिल कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी मी माझ्या भावाला पाठवलं होतं. कारण लेकीच्या मृत्यूनंतर माझी मानसिकता खचली होती. तसेच मुलीच्या अंत्यविधीची तयारी करायची होती. अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या दाजींनी करिश्मा हगवणेला फोन केला. आमचं बाळ आमच्याकडे द्या, असं सांगितलं. पण त्यांनी टाळाटाळ केली.

'राजेंद्र हगवणेच्या मोठ्या भावाने म्हणजेच प्रकाश हगवणे याने माझ्या दाजींना फोन केला. तेव्हा त्यांनी बाळाला घेऊन जा असं सांगितलं. तेव्हा माझा भाऊ, दाजी आणि प्रकाश हगवणे निलेश चव्हाणच्या घरी गेले. जेव्हा बाळाची मागणी केली, तेव्हा निलेशनं पिस्तुलाचा धाक दाखवला', असा अनिल कस्पटे यांनी आरोप केला होता.

Nilesh Chavan arrested from Nepal
Kalyan Bogus Doctor : डॉक्टर असल्याचा बनाव, तरीही रुग्णांवर उपचार, दोघांवर पालिकेची कारवाई; कल्याणमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com