नीट (NEET Exam) पेपरफुटीसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक हे बेमुदत उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. वांगुचक यांना देशभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांनी वांगचुक यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. ठाकरे हे २० जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या १९ दिवसांपासून वांगचुक हे दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.