जळगावच्या परधाडे गावाजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. जळगावमधील नांद्रा माहेजीदरम्यान वडगाव गावाजवळ जळगावकडून पाचोऱ्याकडे येणाऱ्या भरधाव पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या आगीच्या अफवेनंतर बोगीतील प्रवाशांनी रेल्वेची साखळी खेचली. त्यानंतर काही प्रवास रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने पाचारोकडून जळगावकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने समोर असणाऱ्या प्रवाशांना चिरडलं. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ८ पुरुष, ३ महिला आणि १ बालकाचा समावेश आहे. या अपघातात २० ते ३० जण जखमी असल्याचे समजतंय. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.