एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात झळकले ठाकरेसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांचे पोस्टर|VIDEO

Sanjay Dina Patil Poster At Eknath Shinde Rally Goregaon: गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे गटातील खासदार संजय दीनापाटील यांचे पोस्टर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केली असून या खासदारांनी तसे पत्रदेखील लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. या बंडखोर खासदारांची नावेही समोर आली असून त्यांची एकूण संख्या सहा आहे. यांना बडंखोर खासदारांमध्ये संजय दीनापाटील यांचे नाव असल्याचे बोलले जात असून त्यांनी मात्र यावर अनेकवेळा उडवाउडवीचे उत्तर दिले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मेळावा सुरू असून या ठिकाणी खासदार संजय दीनापाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी झळकवले. त्यामुळे संजय दीनापाटील जरी संतापून या प्रश्नावर प्रतिक्रिया देत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे ते शिंदेसेनेत सामील झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com