Mosquito bites: नेहमी तुम्हीच डासांचं आवडतं टार्गेट असता का? तुम्हालाच जास्त का चावतात? विज्ञानाने दिलं उत्तर

मच्छर काही लोकांना जास्त का चावतात यामागे शरीराचा वास, श्वास, घाम आणि तापमान यांसारखे वैज्ञानिक कारणे आहेत. मच्छरांना आकर्षित करणारे संकेत आणि त्यापासून बचावाचे सोपे उपाय जाणून घ्या.
Mosquito Bite
Mosquito BiteSaam Tv
Published On

तुमच्यासोबत कधी असं झालंय का की, पाचजण बसले आहेत, मात्र मच्छर मात्र फक्त तुम्हालाच जास्त चावतात? मग लगेच मनात विचार येतो “यांना माझंच रक्त जास्त आवडतं का काय?” पण खरं सांगायचं तर यामागे विज्ञान आहे आणि मच्छर अगदी सहज कुणालाही नाही तर ठराविक संकेतांवरून माणसाची निवड करतात.

मच्छर फक्त चावण्यासाठीच नाही तर आधी तुमच्या शरीरातून येणारे छोटे-छोटे संकेत ओळखतात. श्वासातून बाहेर पडणारी हवा, शरीराचा वास, घाम, शरीराचं तापमान आणि अगदी कपड्यांचा रंगसुद्धा यामध्ये भूमिका बजावतो. चला तर मग समजून घेऊया की काही लोकांना मच्छर जास्त का चावतात.

डास शरीरातून येणारे संकेत शोधतात

बहुतेक लोकांना वाटतं की मच्छरांना एखाद्या व्यक्तीचं रक्त 'जास्त आवडतं', पण प्रत्यक्षात असं नाही. मच्छर आधी रक्त नाही तर शरीरातून बाहेर पडणारे सूक्ष्म संकेत ओळखतात आणि त्याकडे आकर्षित होतात.

Mosquito Bite
Heart blockage symptoms: ही ५ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हार्ट ब्लॉकेज झालंय

श्वासातून बाहेर पडणारी हवा

आपण श्वास सोडतो तेव्हा शरीरातून एक विशिष्ट वायू बाहेर पडतो. मच्छर हा वायू खूप लांबून ओळखू शकतात. जे लोक हा वायू जास्त प्रमाणात सोडतात, त्यांच्याकडे मच्छर अधिक आकर्षित होतात. त्यामुळे श्वासाची पद्धत आणि शरीराची क्रिया याचाही यावर परिणाम होतो.

घामाचा वास

ज्यांना जास्त घाम येतो, त्यांना मच्छर जास्त चावण्याची शक्यता असते. घामामध्ये काही विशिष्ट घटक असतात जे मच्छरांना आकर्षित करतात. त्यामुळे शरीरावर घाम आणि त्याचा वास वाढला की मच्छर त्या व्यक्तीकडे अधिक ओढले जातात.

शरीराचं जास्त तापमान

मच्छर उष्ण शरीराकडे जास्त आकर्षित होतात. जर तुमचं शरीर सामान्यपेक्षा जास्त गरम असेल, किंवा तुम्ही नुकताच व्यायाम केला असेल, धावपळ केली असेल, तर शरीराचं तापमान वाढतं आणि मच्छरांना तो संकेत लगेच मिळतो. त्यामुळे अशा वेळी मच्छर जास्त चावू शकतात.

Mosquito Bite
Silent heart attack: शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर समजा सायलेंट हार्ट अटॅक येणारे!

कपड्यांचा रंग

तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता याचाही मच्छरांवर परिणाम होतो. संशोधनानुसार, गडद रंगांकडे मच्छर जास्त आकर्षित होतात. काळा, गडद निळा किंवा लाल रंग त्यांना लवकर दिसतो. त्यामुळे मच्छरांच्या जास्त त्रासाच्या काळात हलक्या रंगाचे कपडे घालणं फायदेशीर ठरतं.

मच्छरांपासून वाचण्यासाठी सोपे उपाय

मच्छरांपासून बचाव करण्यासाठी काही साध्या सवयी उपयोगी ठरतात. हलक्या रंगाचे कपडे घालणं, घरात कुठेही पाणी साचू न देणं, नियमित आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवणं यामुळे मच्छरांचा त्रास कमी होतो. रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा जाळीचा वापर केला तर योग्य पद्धतीने संरक्षण होतं.

Mosquito Bite
Heart Attack in Gym: जीममध्ये व्यायाम करताना ही ५ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com