Surabhi Jayashree Jagdish
हार्ट ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना होणे. छातीत दडपण जाणवणे, जळजळ होणे किंवा आवळल्यासारखे वाटणे ही अँजायनाची लक्षणं असू शकतात.
थोडं चालल्यानंतर किंवा जिना चढल्यानंतरही धाप लागणे हे देखील धोक्याचे संकेत असू शकतात. याचा अर्थ हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशा प्रकारचा त्रास वारंवार होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
दररोजची साधी कामं करतानाही सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तेही हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते.
काही वेळा हार्ट अटॅकचा त्रास थेट छातीत न होता शरीराच्या इतर भागांमध्ये जाणवतो. विशेषतः डाव्या हातात, पाठीमध्ये, मानेत किंवा जबड्यात वेदना होऊ शकतात. हे हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.
अचानक हृदयाचे ठोके वेगाने वाढणं, छातीत धडधड जाणवणं किंवा चक्कर येण याकडेही गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. हृदयाचे ठोके अनियमित होणं हे देखील हार्ट ब्लॉकेजचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
अशी कोणतीही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर स्वतःहून औषधं घेण्याऐवजी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळेत निदान झाल्यास हार्टच्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.