ठाकरेंच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या|VIDEO

Thackeray Group MP Sanjay Dina Patil Convoy Accident In Mumbai: मुंबईतील विक्रोळी महामार्गावर ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या सर्व 9 खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी येत असताना विक्रोळी महामार्गावर खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याचे सामोर आले आहे. खासदार पाटील यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा आपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात एका गाडीचे नुकसान झाले असून कोणतीही हानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com