७ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? मातोश्रीवर तातडीची बैठक, ठाकरे काय निर्णय घेणार

Uddhav Thackeray latest news : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Uddhav Thackeray Sena Holds Emergency MPs Meeting Amid Defections : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरेसेनेचे काही खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच संजय उर्फ बंडू जाधव आज उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) एका खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक रविवारी दुपारी मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांनी असा दावा केला होता की 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत काही खासदार त्यांच्या पक्षात सामील होऊ शकतात. ठाकरे गटाच्या एका खासदाराने सांगितले की, या बैठकीचा ऑपरेशन टायगरसोबत कोणताही संबंध नाही. ही एक नियमित बैठक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com