छत्रपती संभाजीनगरात कंकराळा शिवारात एक टेम्पो विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. विहिरीत पाणी जास्त असल्याने वाहन पूर्णपणे बुडाले असून, ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली. क्रेनच्या साहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या वाहनात नेमके किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा तशीच घटना घडल्याने विहिरीना कठडा लावून सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.