VIDEO : पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, संतप्त आंदोलकानं उचलून पोलिसांच्या दिशेनं फेकली; पाहा व्हिडीओ

Badlapur School Case Update : बदलापुरातील शाळेत मुलींवर अत्याचार प्रकरणी. आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. शाळेसमोरचं पोलिसांकडून अश्रुधुर सोडण्यात आले, दरम्यान आंदोलकांनी तेच उचलून पोलिसांच्या दिशेनं फेकले आहेत.

बदलापूर : बदलापूर (पूर्व) येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरुन आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. ज्या शाळेत ही सर्व घटना घडली त्याचं शाळेसमोर पोलिसांकडून अश्रू धूर सोडण्यात आले, यावेळी संतप्त आंदोलकांनी तोच अश्रूधूर पोलिसांच्या ताफ्यावर फेकला आहे. दरम्यान आंदोलकांकडून शाळेत सुद्धा तोडफोड आणि नासधूस करण्यात आली आहे.

बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. सलग 4 तास आंदोलकांकडून रेल रोको सुरू आहे. आता या प्रकरणी कोणते नवनवीन खुलासे होणार, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com