Sunetra Pawar: कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत, सुनेत्रा पवारांनी घेतली विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट; पाहा VIDEO

Sunetra Pawar Meets Family of Vidip Jadhav: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह ५ जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. या मृतांमध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा देखील समावेश होता. साताऱ्यातील मूळ गावी विदीप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या फलटण येथील तरडगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलांना त्यांनी धीर दिला. 'कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,', असा शब्द त्यांनी यावेळी जाधव कुटुंबीयांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com