मनोज जयस्वाल, वाशिम | साम टीव्ही
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव येथे वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब वीज वाहिन्यांवर कोसळून अपघात झाला. सोलर खांब कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून थेट लग्न मंडपावर पडल्या. त्यामुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. तर विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले. सोलर खांब अंगावर पडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं लग्नघरी काही काळ भीतीचं वातावरण होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.