Shocking Video: चढाव चढवताना कार आली रिव्हर्स; ऐनवेळी उडी मारत चालकाने वाचवला जीव, दरीत कोसळणाऱ्या कारचा थरार|VIDEO

Heart-Stopping Moment in Himachal: हिमाचलमधील कुल्लू-मनाली परिसरात थरारक अपघात घडला. एका कारने दरीत कोसळण्यापूर्वी चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारून जीव वाचवला. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू-मनाली परिसरातून थरारक अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक कार उताराच्या रस्त्यावरून दरीकडे जाताना दिसतेय. कार घसरू नये म्हणून काही नागरिकांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आलं. थोड्याच वेळात ही कार दरीत कोसळली. सुदैवाने कार चालवत असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कारमधून उडी मारली आणि त्याचा जीव वाचला. मात्र, कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, तो कुल्लू-मनाली परिसरातील असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com