तर मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; शिंदेंचा सरकारला मोठा इशारा|VIDEO

Shashikant Shinde Warning Maharashtra Government: महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यात भीषण दुष्काळ पडल्याने बळीराजा हा संकटात सापडला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ घेतली असून खरीप पीक करपली आहे. ऐन सणासुदीच्या दरम्यान जगाचा पोशिंदाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहे. सरकारने देखील राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे सांगत पंचनामे करण्याचे निर्देश दिलेय. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदार, आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवारांनी सर्वांकडून दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या उपस्थित सर्व खासदार आमदारांनी आपला एक महिन्याचा पगार हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही एकाही मंत्र्याला दिवाळी साजरी करू देणार नाही असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com