दादांची शेवटची इच्छा पूर्ण करावी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, प्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक वक्तव्य

NCP merger latest news : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. ‘दादांची शेवटची इच्छा पूर्ण करावी’ असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण दिले.

Sayaji Shinde statement on NCP merger latest news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं अन् दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, असे सयाजी शिंदे म्हणालेत. ते पुण्यात बोलत होते.

सयाजी शिंदे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं या निवडणुकीच्या वेळेला की आता एकत्र येणार यावर चर्चा सुरू असल्याचे समजतेय.'

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशा प्रकारची चर्चा झाली असताना अचानक काहीतरी वेगळे घडणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. जर पक्षाची ताकद वाढवायची असेल, तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सयाजी शिंदे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com