Ravindra Dhangekar Viral Audio Clip: तुम्ही जे काम करत आहे, ते चंद्रकांत पाटील यांनी कारायले पाहिजे होते; धंगेकरांची 'ती' ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल|VIDEO

Chandrakant Patil Targeted In viral Dhangekar Audio: शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या चांगलेच चर्चेत आहे.जैन मंदिराच्या जागेच्या वादावरुन धंगेकर यांनी भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर रोज नवनवीन गंभीर आरोप करत असल्याने महायुतीमध्येच आंतरिक वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहे. यावरूनच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि रवींद्र धंगेकर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.या क्लिपमध्ये रमेश पाटील यांनी धंगेकरांना फोन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. धंगेकर तुम्ही जे काम करत आहे ते चंद्रकांत पाटील यांनी कारायले पाहिजे होते. मात्र या क्लिपमध्ये रवींद्र धंगेकर यांनी मिश्किलपणे आपली भीती व्यक्त केली आहे. धंगेकर म्हणाले, नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ. यावर रमेश पाटील म्हणाले, आय लव्ह यु भाऊ असे म्हटले. सध्या ही ऑडिओ क्लिप राज्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साम टीव्ही सदर ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com