एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray Attack On BJP Over AIMIM Alliance: शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स प्रकरण आणि बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी नगरसेवकावरून भाजपचा समाचार घेतला.

मुंबई येथील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा पार पडत आहे. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करत वस्त्रहरणच केले. अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली होती. या प्रकरणी संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावर राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. अंबरनाथमध्ये भाजप आणि कॉँग्रेसची युती झाली होती. यानंतर भाजपचे 66 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. यावर राज ठाकरे म्हणाले, जर इतक्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून येत असेल तर नागरिकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला. ड्रग्स प्रकरणातील एका आरोपीला उमेदवारी दिल्याने ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. तसेच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला बिनविरोध नगरसेवक केल्याने राज ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com