अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

ambernath Political News : अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट आलाय...नगपालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेनं कुरघोडी करत भाजपला चांगलाच धक्का दिलाय...त्यामुळे भाजपच्या तोंडचा घास शिंदेसेनेनं कसा हिसकावून घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
political
bjpSaam
Published On

काँग्रेसच्या१२ नगरसेवकांना थेट भाजपात प्रवेश देऊन अंबरनाथ नगरपालिकेतला सत्तेचा तिढा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सोडवला खरा...मात्र या सत्तेच्या संघर्षात दुसऱ्याच दिवशी मोठा ट्विस्ट आला. खासदार श्रीकांत शिंदेंनी थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना गळाला लावत रवींद्र चव्हाणांची हीच खेळी उधळून भाजपवर कुरघोडी केली.. सत्तासंघर्षांच्या दुसऱ्या अंकात शिंदेसेनेनं बाजी मारत अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय...

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे 28, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगसेवकांनी नगरपालिकेवर सत्ता स्थापन केल्याचा दावा आहे...तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात पक्षप्रवेश केलेल्या 12 नगरसेवकांसह भाजपचे 15 नगरसेवक मिळून संख्याबळ 27 झाले..... त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून शिंदेसेनेनं सत्ता स्थापनेसाठी भाजपवर कुरघोडी केलीय.

अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय... मात्र शिवसेनेतील फुटीनंतर शहरातील व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला कंटाळून अंबरनाथकरांनी भाजपच्या नगराध्यक्षाला पंसती दिली... मात्र सत्तेसाठी लागणाऱ्या पुरेसे नगरसेवक निवडून आणण्यात भाजपला अपयश आलं. मात्र शिंदेसेनेनं २८ जागांसह पहिल्या क्रमांकावर मजल मारली. त्यामुळे याठिकाणी राज्याच्या सत्तेत मित्र असलेले अंबरनाथमध्येही युती करतील असं वाटत असताना शिंदेंच्या तोंडचा घास भाजपनं हिरावला.

political
परळीत शिंदे-मुंडेंची MIM सोबत युती; भाजपनंतर शिंदे-मुंडेंचा MIMसोबत घरोबा, VIDEO

अंबरनाथमधील भाजपचे नेते गुलाबराव करंजुले पाटील आणि शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातल्या वादामुळे अंबरनाथमध्ये युती होऊ शकली नाही..आणि यामुळेच सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची अभद्र आघाडी राज्याला पाहायला मिळाली. मात्र शिंदेसेनेनं कुरघोडी केल्यामुळे सर्वात जास्त कोंडी झाली ती सत्तेसाठी भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांची. आता हा सत्तेचा संघर्ष इथेच थांबणार की अजून तिसरा अंक पाहायला मिळणार याचीच उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com