परळीत शिंदे-मुंडेंची MIM सोबत युती; भाजपनंतर शिंदे-मुंडेंचा MIMसोबत घरोबा, VIDEO

Parli political news : भाजपनं एमआयएमसोबत केलेल्या युतीमुळे आधीच राजकारण तापलेलं असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि शिंदेसेनेनं MIM सोबत युती केलीय... विचारधारेला तिलांजली देऊन MIM सोबत शिंदे, मुंडेंनी युती कुठे केली? MIMसोबतच्या युतीनंतर कशी वादाची ठिणगी पडलीय? पाहयात या स्पेशल रिपोर्टमधून..
Parli news
Parli political newsSaam tv
Published On

अकोटमध्ये हिंदूत्वाचे विचार बाजूला सारून भाजप MMIसोबत गेली आणि आता धनंजय मुंडेंचं वर्चस्व असलेल्या परळी नगरपरिषदेत शिंदेंसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने MIM सोबत घरोबा केलाय... परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेसेनेला एमआयएमने पाठिंबा दिलाय..साहजिकच विरोधकांनी यावर सडकून टीका केलीय..

Parli news
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका; तातडीने खासगी रुग्णालयात दाखल

या युतीमुळे परळी नगरपरिषदेतील राजकीय समीकरण कसं बदललं पाहूयात...

परळी नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 16, शिंदेसेनेचे 2, एमएमआयएमचा 1, तर अपक्ष 4 नगरसेवकांनी मिळून 23 सदस्यांचा नवा गट स्थापन केलाय. या गटाच्या गटनेतेपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आलीय.. तर दुसरीकडे परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, काँग्रेस 1 तर आणखी अपक्ष 2 नगरसेवक निवडून आलेत... त्यात भाजपच्या 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलाय...

दुसरीकडे स्थानिक पातळीवर अशी युती झाली असताना एकनाथ शिंदे आणि इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच जुंपलीय... जलीलांनी तर शिंदेंचा उल्लेख "गुस्ताख-ए-रसूल" असा केलाय..दरम्यान नवनिर्वाचित गटनेत्यांनी मात्र ही युती जनतेचे पश्न सोडवण्यासाठी झाली असल्याच म्हटलयं..

Parli news
लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कट्टर वैरी सत्तेसाठी एकत्र आले... सत्ताकारण करताना जवळपास सर्वच पक्षांनी विचारधारा, राजकीय नितीमत्ता याला तिलांजली दिली असल्यानं राजकारणाचा मात्र चिखल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com