Raj & Uddhav Thackeray: दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? मुंबईकरांची मन की बात; नागरिक काय म्हणाले? VIDEO

Thackeray Brothers Come Together After Years:मराठी भाषेच्या हक्कासाठी उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीविरोधी मोर्चा ५ जुलै रोजी मुंबईत निघणार आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित नेतृत्वामुळे जनतेमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात काल उद्धव आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करत कुठल्याही परिस्थितीत त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू देणार नाही असे दोन्ही बंधूंकडून सांगण्यात आले. तसेच दोघांनीही आंदोलनाचा विडा उचलला. मात्र राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन केला होता, दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढू आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल असे सांगितल्यानंतर येणाऱ्या 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मराठी भाषासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

पाच जुलैला होणाऱ्या हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र दिसून येणार याबद्दल राजकीय मतभेद बाजूला सारून मराठी माणूस म्हणून प्रत्येकाला उत्सुकता आहे. काय नेमकं या सर्व सामान्यांचे म्हणणं आहे बघा व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com