Indrayani River: इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर, चारही पूल वाहतुकीसाठी बंद; पाहा VIDEO

Pune Heavy Rainfall: पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे.

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील चार पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने पूल बंद करण्याचा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेतला असून सर्व भाविक, वारकरी आणि नागरिकांनी त्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, वाढत्या पाणीपातळीमुळे कोणत्याही नागरिकाने इंद्रायणी नदीपात्राकडे किंवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये.

तसंच, बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित क्षेत्रातून जाण्याचाही प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही सार्वजनिक सूचना जारी केली असून परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com