राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले, तिरंगा फडकावला; 140 खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा|VIDEO

Rahul Gandhi Protest: निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या 140 हून अधिक खासदारांचा मोर्चा. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नेत्यांना रोखल्यानंतर राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले आणि तिरंगा फडकावला.

निवडणूक आयोगाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संगळ्याच्या विरोधात आज इंडिया आघाडीच्या 140 हून अधिक खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी निर्वाचन सदन जवळ बरिकेडस लावून इंडिया आघाडीच्या नेत्यांना अडवल. राहुल-प्रियांका गांधी यांच्यासह शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलात सहभागी झाल्या होत्या. हे सर्व खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जात असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते खासदार हे थेट बरिकेड्सवर चढले आणि तिरंगा फडकवायला सुरुवात केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोर आहेत अशा घोषणा खासदार देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com