
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
पीएमपीएल बस चालक आणि प्रवासीमध्ये हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील हडपसर मुंढवा रस्त्यावर घडलीय. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बस चालक आणि प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारी होताना दिसतेय. दोघांनी एकमेकांची कॉलर पकडलीय. चालकाने प्रवाशीची कॉलर पकडत त्याला कानशिलात मारत असल्याचं दिसत आहे.
रेल्वे आणि लोकलमधील प्रवाशांमध्ये होणाऱ्या मारामारीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिले असतील. यात अनेकदा मेट्रोमधील विचित्र प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु आता राज्यातील सर्वात संस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सिटी बसचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात पीएमपीएल बसचा चालक आणि प्रवासीची तुंबळ हाणामारी होताना दिसतेय. हाणामारीचा हा व्हिडिओ बसमधील एका प्रवासाने बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय.
चालकाने प्रवाशाला बसच्या मागील दरवाजातून उतरवण्यास विरोध केला. त्यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. ही घटना हडपसर मुंढवा रस्त्यावर घडली. येथील बस स्टॉपवर उतरताना प्रवाशी बसच्या मागील दरवाजातून उतरू लागला. त्याला वाहकाने आणि चालकाने विरोध केला. यातून या तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर चालक अधिक आक्रमक झाला. बसच्या खाली उतरत प्रवासीला मारहाण केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ पुण्यातील आहे. या व्हिडिओमध्ये पीएमपीएल बसचा चालक एका प्रवासीला मारताना दिसत आहे. पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला प्रवाशी मुंढवा येथील स्टॉपवर उतरत होता. बसमधून उतरत असताना त्याने मागील दरवाजाचा उपयोग केला. त्याला चालक आणि वाहकाने विरोध केला, यातून त्यांच्यात वाद झाला.
ह वाद इतका टोकाला गेला की, चालकाने प्रवासीला मारहाण केली. पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती बसच्या खाली उतरला. त्याच्यात आणि चालकामध्ये वाद झाल्यानं चालकाने काम सोडून बसच्या खाली उतरला आणि वाद घालणाऱ्या प्रवासीला पकडलं. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यांनी एकमेकांची कॉलर पकडली होती. चालकाने प्रवाशाची कॉलर पकडत त्याच्या कानाशिला लगावली. चालक प्रवासीला मारहाण करत असताना वाहक व्हिडिओ बनवून लागला होता. बसमधील प्रवाशांनी त्या तिघांच्या हाणामारीचा व्हिडिओ बनवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.