Latur Narcotics Factory: कुंपनच शेत खातंय..! लातूरमधील ड्रग्स प्रकरण; पोलिसवालाच निघाला ड्रग्स माफिया, शेतात थाटला कारखाना

Police Constable Run Drugs Factory: मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने लातूरमध्ये ड्रग्सचा कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा हा ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त केलाय.
Latur Narcotics Factory
Police Constable Run Drugs Factorsaam Tv
Published On

मुंबई, पुणे, तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्सचं कनेक्शन उघड झालंय. लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना गावात एमडी ड्रग्स बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलीय. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या ड्रग्सतच्या धंद्यात पोलीस यंत्रणेतील कर्मचारी सहभागी असल्याची बाब उघड झालीय. यामुळे लातूर ड्रग्स प्रकरणाचं मुंबईशी कनेक्शन जुडलंय.

सात जणांना पोलीस कोठडी

दरम्यान डीआरआयच्या कारवाईत ११ किलो ६६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत, १७ कोटी रुपये आहे. ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस हवालदारासह सात जणांना पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणातील पाच आरोपींना चाकूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात १) प्रमोद केंद्रे २) महंमद शेख ३) जुबेर मापकर ४) आहाद मेमन ५) अहमद खान, अशी या आरोपींची नावे आहेत.

Latur Narcotics Factory
Washim Crime: अनैतिक संबंधाचा संशय, झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावरून विळा फिरवला; नंतर स्वत:लाही संपवलं

शेतात उभारली ड्रग्सची फॅक्टरी

ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी असलेला पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. हा हवालदार चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवाशी आहे. त्याच्या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची निर्मिती करायचा. येथून तो, मुंबई ,पुणे यासह इतर शहरात ड्रग्स पुरवत होता.

हा पोलीस हवालदार मुंबईवरून गावाकडे त्याच्या ब्रिझा गाडीने आठवड्यातील दोन ते तीन दिवस सतत चक्कर मारत असायचा. या प्रकरणातील इतर आरोपींना ड्रग्सचे साहित्य पुरवायचा. त्यांच्याकडून ड्रग्स तयार करून घेत होता, त्यानंतर ते ड्रग्स मु्ंबई, पुणे शहरात पुरवत असायचा.

Latur Narcotics Factory
Crime News: कायमचा झोपायला चाललोय...; बायकोचं स्टेट्स पाहिलं, नंतर आईला मेसेज केला, अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com