Crime News: कायमचा झोपायला चाललोय...; बायकोचं स्टेट्स पाहिलं, नंतर आईला मेसेज केला, अन्...

Uttar Pradesh Crime: सिमरनच्या त्रासाला कंटाळून राजने गळफास घेत आत्महत्या केली. सिमरनच्या घरच्यांनी राजला मारहाण देखील केली होती. राजच्या आत्महत्ये प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
crime news
Uttar Pradesh Crimegoogle
Published On

'मी कायमचा झोपायला चाललोय, मला उठवू नका, असा आईला मेसेज करत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पत्नीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने आईला मेसेज केला आणि गळफास घेत आत्महत्या केलीय.

दोन दिवसापूर्वी मृत युवकाला त्याच्या सासरच्यांनी मारहाण केली होती. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव राज आर्य आहे. एक वर्षापूर्वी त्याचं सिमरन नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. दरम्यान राजने राहत्या घरी आत्महत्या केल्याने त्याच्या घरच्यांनी सून सिमरनवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी राज पत्नी सिमरनला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. ते दोघेही देहारादूनच्या एका कार्यक्रमाला जाणार होते.

crime news
Husband-wife crime : बॉयफ्रेंडसोबत भविष्याचा प्लान आखला, सरकारी नोकरीसाठी नवऱ्याला संपवलं

पण तिच्या घरच्यांनी राजसोबत सिमरनला पाठवण्यास नकार दिला. तसेच सिमरनच्या भावांनी राजला मारहाण केली होती. त्यानंतर सिमरनच्या घरच्यांनी राजच्या घरच्यांवर खोटा गुन्हा दाखल केला. ज्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तिथे सिमरनचा भाऊही तैनात आहे. त्याने राज आणि त्याच्या वडिलांना सर्वांसमोर मारहाण करत जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती.

crime news
Nashik Crime: नाशिक हादरले! सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

सिमरनने राजला धमकीही दिली होती. तू साडेदहा वाजेपर्यंत तुरुंगात जाशील, बेस्ट ऑफ लक, अशी सोशल मीडियावर पोस्ट सिमरनने टाकली होती, असा आरोप आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या घरच्यांनी केलाय. राज आर्य याच्या आत्महत्येनंतर पत्नी सिमरनसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृतकाचा भाऊ सुरेशने याबाबत तक्रार देत पत्नी सिमरनसह भाऊ सागर, त्याचे आई वडील, बहिण-दाजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

एका वर्षापूर्वीच राज आणि सिमरन यांचं लग्न झाले होते, या दोघांना १ मुलगाही आहे. सिमरन दिवसभर कुणाशी तरी बोलत राहायची. त्यावरून राज आणि त्याच्या घरच्यांनी सिमरनला समजले परंतु तिने ऐकले नाही. राजने तिच्या घरच्यांनाही ही बाब सांगितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com