Maharashtra Politics: 'कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती', खा. शाहू महाराजांचं वक्तव्यं

MP Chhatrapati Shahu Maharaj: शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे. यावरच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी यांनी प्रतिक्रिया दिली.

इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान प्रकरणी खरेतर प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती. राज्य सरकार म्हणते कारवाई करणार पण ते लवकर कारवाई करत नाही असा आरोप कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केला. शाहू महाराज म्हणाले, ऐकण्यात आले आहे की ते दुसऱ्या राज्यात गेले आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई ही झालीच पाहिजे मुळात स्वतः सरकारने यांच्यावर गुन्हा नोंदवाला पाहिजे जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत. त्या कायद्यांतर्गत कारवाई तातडीने करता येते नवीन कायद्याची गरज नाही असे शाहू महाराजांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com