खरगेंचं वय पाहता त्यांनी आता..., नरेंद्र मोदींची राज्यसभेत विरोधकांना टोलेबाजी|VIDEO

PM Modi Remarks On Mallikarjun Kharge In Rajya Sabha: राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घोषणांवर मोदींची प्रतिक्रिया चर्चेत.

लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी आज राज्यसभेत भाषण केले. पण भाषण सुरू होताच कॉंग्रेसचे खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.

तरीही मोदींनी भाषण सुरूच ठेवले. मोदींचे भाषण सुरू असताना कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आसनावर उभे राहून घोषणा दिल्या. हे पाहताच नरेंद्र मोदी म्हणाले, खरगे यांनी वयाचा विचार करून खाली बसावे आणि भाषण करावे असा टोला ही लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com