NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेलांचं नाव घेणारे पियुष गोयल यांची दिलगिरी; म्हणाले, दिशाभूल...

Piyush Goyal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य करणारे भाजपचे वरिष्ठ नेते पियुष गोयल यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वात काम करत आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केली. मला चुकीची माहिती दिली गेली. माहितीची पडताळणी न करता माध्यमांसमोर काही विधानं केली. त्यामुळं दिशाभूल झाल्यानं दिलगिरी व्यक्त करतो, असं गोयल म्हणाले.

एक्सवरील पोस्टमध्ये काय म्हणाले गोयल?

प्रफुल्ल पटेलांच्या नियुक्तीबाबत मला चुकीची माहिती दिली. त्याची पडताळणी न करताच मी माध्यमांकडे काही विधाने केली. ही माहिती चुकीची असल्याचं मला समजलं. राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वात काम करत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे गोयल यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com