लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकामध्ये दर्शनासाठीच्या आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर दर्शनाचा काळाबाजार उघड झाला आहे. या गंभीर प्रकाराची मंदिर समितीने दखल घेतली असून कायदे तज्ञांचा सल्ल्याने कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.उद्या पासून अधिक मास सुरु होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. अशातच वशिल्याच्या दर्शनासाठी प्रती व्यक्ती दोनशे रुपये या प्रमाणे पाच भाविकांसाठी येथील एका दलालाने फोन पे वर एक हजार रुपये घेतल्याची बाब यातून समोर आली आहे. वशिल्याने दर्शन देणारा दलाल आणि भाविकामध्ये पैसे घेवून दर्शन देण्याबाबत झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. आज सायंकाळी ही कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान फो पे वर पैसे पाठवण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर वरुन पोलिस धागेदोरे शोधून काढतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.