NEET पेपर फुटीप्रकरणात मोटेगावकर CBI च्या ताब्यात, मात्र आजपासून RCC क्लास सुरू|VIDEO

RCC Motegaonkar Latur Classes Restart After NEET Paper Leak Case: NEET पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकर CBI च्या ताब्यात असताना लातूरमधील RCC क्लासेस पुन्हा सुरू केले आहे.

लातूर: RCC संस्थेचे मोटेगावकर हे सध्या CBI च्या ताब्यात असतानाही लातूरमधील RCC क्लासेस नियमितपणे सुरू ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी क्लासच्या नियोजन समितीने महत्वाचा निर्णय घेत सराव परीक्षांचे आयोजन केले आहे.

फेरपरिक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये दाखल झाले आहे असून क्लासमध्ये सराव परिक्षांना सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळणार आहे.

क्लास प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा हिताला प्राधान्य देत शैक्षणिक उपक्रम सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडींमुळे RCC प्रकरणात नवीन वळण आले असून पुढील काळात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com