उपमुख्यमंत्र्यांसह पवार कुटुंब दिल्लीमध्ये, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाला वेग? VIDEO

Pawar Family Delhi Meeting Impact On NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंब दिल्लीमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या विलिणीकरनाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या कालपासून दिल्लीमध्ये असून त्यांच्यासोबत पार्थ आणि जय हे देखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच आज रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील दिल्लीमध्ये गेले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार असताना शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या एकत्र येण्याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या असे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आज पवार कुटुंबीय दिल्लीमध्ये असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com