नाशिकमधील TCS धर्मांतरण प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी निदा खानला अटक केली होती. यानंतर संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचा संबंध नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाशी जोडला होता. यानंतर पोलीस हे इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचले असून त्यांची चौकशी करत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्राइम ब्रांचचे अधिकारी हे जलील यांची चौकशी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.