पावसाचा कहर! नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, लोकल ट्रेन 40 ते 50 मिनिटे उशिराने|VIDEO

Flooded Tracks in Nalasopara Cause Major Delays in Local Train Services: नालासोपारा येथे मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर आणि स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे लोकल गाड्या ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून गाड्या तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे स्थानकाच्या बाहेरही परिस्थिती गंभीर आहे. चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे प्रवाशांना त्याच पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

वसई-विरार शहरात पावसाचा जोर अद्याप कायम असून जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेली शेकडो दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com