मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७१ वर पोहोचला असून अनेक भागांमध्ये धुरक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील वाढत्या प्रदूषणामागे वाहनांचा धूर आणि बांधकामांमधून उडणारी धूळ ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या आणि सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे कण मिसळत आहेत. याचा परिणाम शहरातील हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. या वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना होण्याची शक्यता आहे. प्रदूषित हवेमुळे खोकला, सर्दी, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढत असताना प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकामांमधील धूळ आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात मुंबईकरांना वाढत्या प्रदूषणाचा आणखी त्रास सहन करावा लागू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.