मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांची एका तरुणाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाच्या या कृत्यानं भेदरलेल्या महिला प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कुर्ला स्थानकात लोकल थांबल्यानंतर सहप्रवासी आणि फलाटावरील प्रवाशांनी आरोपी तरुणाला पकडलं. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला. आरोपीला कुर्ला स्थानकातील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कुर्ला स्थानकात आरोपी तरुणाला चोप दिल्यानंतर त्याला आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आरोपीला आरपीएफच्या ताब्यात दिल्याचे दिसते. काही प्रवाशांनी या आरोपीला पकडले आहे. पण आरोपी काही केल्या त्या सर्वांना ऐकत नाही. जीन्यावरून उतरताना त्याला अक्षरशः फरफटत नेल्याचे व्हिडिओत दिसते. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 'चोर तर चोर वर शिरजोर' या म्हणीप्रमाणे हा आरोपी तरूण 'भाई, मुझे बचा लो' अशी ओरड करताना या व्हिडिओत दिसतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.