संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी ते उल्हासनगरदरम्यान धावणाऱ्या खोपोली लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला करून लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं.
या हल्ल्यात नितेश कुमार शहा हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांचा खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत आरोपी जोगिंदर सिंग लबाना याला अटक केली.
लबाना हा उल्हासनगर परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला कल्याण न्यायालय येथे हजर करण्यात आले असता कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.