Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलसेवा ३० ते ३५ मिनिटं उशिराने; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Disrupted: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. लोकलसेवा ३०ते ३५ मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. विक्रोळी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी स्थानकाजवळ लोकल थांबत थांबत पुढे जात आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी लोकलसेवा ३० ते ३५ मिनिटं उशिराने सुरु आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरूस्तीचे काम वेगाने सुरू असून लोकलसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ऑफिसला पोहचण्यासाठी उशिर होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com