Jalgaon Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, २ जणांचा मृत्यू, १५ जखमी | VIDEO

Jalgaon travels bus truck collision : मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये धडक होऊन दोन प्रवासी ठार, 15 जखमी. रात्री अपघात झाल्याने मदतकार्यात अडथळे. पोलीस तपास सुरू.

Muktainagar Highway Accident: जळगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले, तरीही स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, जळगावहून अकोल्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स बस ट्रकला जोरदार धडकली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com