नाना पटोलेंवर नोटांचा वर्षाव; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, video

nana patole viral video : भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात नाना पटोलेंवर नोटांचा वर्षाव करण्यात आला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भंडाऱ्यात कव्वालीच्या कार्यक्रमात मंचावर बसलेल्या काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या अंगावर नोटांचा वर्षाव करण्यात आलाय. नोटांचा वर्षाव होणार हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. साकोली येथे बुद्ध पौर्णिमानिमित्त कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील व्हिडिओ असल्याची माहिती समोर येतंय. कव्वालीच्या कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित झाले. त्यानंतर थेट मंचावर बसल्यानंतर कव्वाला त्यांच्या बाजूला होते. कव्वाली रंगलेली असताना, कव्वालांवर हा नोटांचा वर्षाव करताना असताना त्यातील काही नोटा नानांच्या अंगावर पडल्याचं या व्हिडिओत दिसून येतं आहे. या व्हिडिओवर अद्याप नाना पटोले यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com