Mira Bhayandar Morcha: म.. मराठीचा, म.. मीरा भाईंदरचा! विरोधाला न जुमानता मराठी माणूस एकवटला | VIDEO

Mira Bhayandar Marathi Protest Against: मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी निघालेल्या मोर्चात मनसे, ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले. पोलिसांनी अविनाश जाधव यांना पहाटे अटक केली तरी मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी केला.

परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चायाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आता मुंबईतूनही मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मीरारोडमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी पहाटे 3 वाजताच मनसेचे नेते अविनाश जाधव यांना अटक केली होती. यावरून मनसे कार्यकर्ते संतापले होते. पोलिसांच्या या भूमिकेवर टीका करत मुंबईचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई देखील मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी हे दोघेही लोकलने मीरा भाईंदरला पोहचले होते. तसेच या मोर्चाला ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे हे देखील सहभागी झाले होते. हा मोर्चा यशस्वी झाल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून म.. मराठीचा, म महाराष्ट्राचा, म.. मीरा भाईंदरचा अशी घोषणाबाजी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com