Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Mumbai Matang Samaj Morcha News : अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाचा आझाद मैदानात महामोर्चा. जीआर जारी होईपर्यंत मुंबई न सोडण्याची आंदोलकांची भूमिका.

Mumbai Matang Samaj Protest: अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची मागणी प्रलंबित राहिल्याने मातंग समाजात नाराजी वाढली आहे. या मागणीसाठी आज राज्यभरातून मोठ्या संख्येने मातंग बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानात सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

दरम्यान, मोर्चापूर्वीच माजी आमदार रमेश कदम यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी ७ वाजता रोखून धरले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांना आंदोलनस्थळी जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रमेश कदम यांच्यावरील कारवाईमुळे मातंग समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाने तातडीने उपवर्गीकरणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com