Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; पाहा VIDEO

Traffic Jam On Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून ४ ते ५ किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

रायगडमध्ये मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. माणगाव आणि इंदापूर येथे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर या दोन्ही ठिकाणी ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि मतदार आडकले आहेत. एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून राहिल्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी देखील हैराण झाले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. मतदान करता यावे त्यामुळे शहरामध्ये राहणारे नागरिक गावाकडे आले आहेत. अशामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे ते अडकले आहेत. मतदार तसेच प्रवासी वाहतूक कोंडीमध्ये अडकू नयेत यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घातली होती. मात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहन रस्त्यावर आले आहेत. त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com