मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; १०-१२ किलोमीटर वाहनांच्या रांगा, VIDEO

Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई - अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. मंगळवारी दुपारपासून दोन्ही दिशेकडील मार्गिकांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मनोज तांबे, वसई | साम टीव्ही

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारपासून दोन्ही दिशेकडील मार्गिकांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

गुजरातहून मुंबई व ठाण्याकडे जाणाऱ्या लेनवर सुमारे १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मीरारोड येथील काशीमीरा ते वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरापर्यंत सुमारे १५ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली आहे. गेल्या दोन तासांपासून ही वाहतूक कोंडी कायम असून, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गावर वाहने अतिशय संथगतीने पुढे सरकत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com