रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; परप्रांतीयांची 2 किमीची रांग, पाहा VIDEO

Migrant Workers Crowd At Udhna Railway Station Summer Rush: उन्हाळी सुट्ट्यांच्या सुरुवातीलाच उधना रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून तब्बल २ किमी लांब रांगा लागल्या आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांच्या सुरुवातीलाच गुजरातमधील उधना रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा अक्षरशः महापूर लोटला आहे. अचानक वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मूळ गावी परतण्यासाठी हजारो परप्रांतीय कामगारांनी उधना स्थानक गाठल्याने तिकीट काउंटर आणि प्लॅटफॉर्म परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तब्बल २ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या गर्दीत महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

प्रवाशांना पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे. गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी ढकलाढकली होत असून काही प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्याची गरज व्यक्त केली जात असून, अधिक विशेष गाड्या सोडण्याची मागणीही प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com