भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

manoj jarange news : मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला आहे.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे हे भर उन्हात उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश व्हावा, यासाठी जरांगे हे अंतरवाली सराटमधील शिवारात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला. मराठा बांधवांकडून गेल्या अर्धा तासांपासून रस्ता रोको सुरू आहे. मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मंत्री राधाकृष्णा विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com