महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे एसटी महामंडळाला तब्बल 310 कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि या आर्थिक तोट्यावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात परिवहन मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक म्हणाले, सलग तीनवेळा डिझेलची झालेली दरवाढ आणि एसटीसाठी लागणारे स्पेअर पार्टस, टायर, ट्यूब आणि इतर वस्तूंमध्ये झालेली दरवाढ त्यामुळे एसटी महामंडळाला डिझेलच्या माध्यमातून 310 कोटींचा वार्षिक फटका बसलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत एसटीची दरवाढ ही आम्ही केलेली नाही. पण भविष्यात करावी लागू शकते. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या सगळ्या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल आणि अंतिम निर्णय आम्ही पुढील आठवड्यात घेऊ असे सुतोवाच मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.