Rahul Gandhi News : विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या प्रचारार्थ राहुल गांधी मैदानात; अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार, पाहा VIDEO

Rahul Gandhi Will take 15 to 17 Sabha : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी स्वत: मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतेय. राहुल गांधी राज्यात सभा १५ ते १७ सभा देखील घेणार आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने एक नवीन रणनिती आखली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात महाराष्ट्रात दिसणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधी यांनी सांगलीत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर आता १५ ते १९ सभा घेण्याचं नियोजन देखील महाराष्ट्र कॉंग्रेसकडून करण्यात आलंय. आता ते महाराष्ट्रामध्ये सभा घेणार असल्याची माहिती मिळतेय. प्रियांका गांधा देखील राज्यात दहा सभा घेणार असल्याचं समोर आलंय.

राज्यात आता विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी स्वत: मैदानात उतरणार आहेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अद्याप जागावाटपाचा आकडा जाहीर केलेला नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका पार पाडली. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झालेला दिसला. त्यामुळे आता विधानसभेसाठी कॉंग्रेसला किती जागा मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीत जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com