Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का, आणखी नावे यादीतून वगळणार; सरकारने इनकम टॅक्स विभागाकडून मागितला खास अहवाल? VIDEO

State government income verification for Ladki Bahin scheme: महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाशी करार करण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार आणि प्राप्तिकर विभाग यांच्यात लवकरच एक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. या करारामार्फत प्राप्तिकर विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची उत्पन्नविषयक माहिती मिळवली जाणार असून, त्या आधारे अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार आहे. मात्र, योजनेतील लाडक्या बहिणींच्या वैयक्तिक माहितीस गोपनीयतेच्या चौकटीत ठेवण्याची खबरदारी यामध्ये घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने याआधीच प्राप्तिकर विभागाकडे संबंधित माहितीचा अहवाल मागवलेला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही हा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता अधिकृत सामंजस्य कराराच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. सध्या यासंदर्भात प्राथमिक पातळीवर बोलणी सुरू असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com