Budget Session: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पांत विशेष तरतूद, अजित पवारांनी काय घोषणा केल्या? VIDEO

Singhstha Kumbh 2027: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरगोस निधी सरकारने दिला आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ नुकताच संपला आहे. आता महाराष्ट्रातील नाशिक येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. हा कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणार असून, कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी "नमामी गोदावरी" अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना केली जाणार असून, आवश्यक तितका निधी देण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. याशिवाय, नाशिक येथे रामकालपथ विकास प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने 65 कोटी रुपये मंजूर केले असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 146 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच, रामकुंड, गोदातट आणि काळाराम मंदिराचे सुशोभीकरण केले जाईल. यासह, नाशिक जिल्ह्याच्या विविध विकास प्रकल्पांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com