Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. त्यापूर्वी आज शरद पवार यांनी भोर मतदारसंघात उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेला देशात वेगळं चित्र होतं. भाजप बाबासाहेबांच्या घटनेत बदल करणार होते. या देशाची घटना वाचवायची असेलं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल पाहिजे हे आम्ही ठरवलं. आम्हाला महाराष्ट्रमध्ये अमूलग्रा बदल घडवायचा आहे असं म्हणत त्यांनी लडकी बहीण काढली, कुणी सन्मान करत असेलं तर काही नाही. पण त्यांनी सन्मान कसा केला, आज बहिणींना संरक्षण नाही, सन्मान नाही, अशी टीका पवारांनी लाडकी बहिण योजनेवर केली आहे. महायुतीच्या सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अत्याचार किती वाढले? दर महिन्याला 67 हजार तक्रारी पोलीस स्टेशनंमध्ये येतात. 64 हजार मुली बेपत्ता होतात, कस राज्य चालवता? असा सवाल करत बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाही, फक्त या योजनेतून मतांचा जोगवा मागण्याच कामं सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
आपल्याला ठोस पाऊल टाकायला लागतील. त्यासाठी सत्तेत बदल हवा. सत्ता हातात आली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सुळे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारा कर्तुत्ववान प्रतिनिधी मतदारसंघात दिलेला आहे. हातांच्या पंजाला मतदान करा. एक व्हा आणि महाराष्ट्रमध्ये परिवर्तन करा. मला खात्री आहे मतांचा विक्रम करून संग्राम थोपटे निवडून येतील. मताची खिचडी करू नका, मत योग्य ठिकाणी जाईल याची काळजी घ्या, असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.